
Senco Gold Share Price | सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( सेन्को गोल्ड कंपनी अंश )
सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअरची किंमत IPO लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 2.3 पट अधिक वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सेन्को गोल्ड स्टॉक 1.06 टक्के घसरणीसह 977.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म Emkay ने सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 1100 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, सेन्को गोल्ड कंपनीची वाढ तिच्या स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत चांगली आहे. या स्टॉकमध्ये तेजी असून देखील तो प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत स्वस्त मूल्यांवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचा ऑपरेटिंग नफा आर्थिक वर्ष 2024-26 दरम्यान 23-27 टक्के CAGR दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
मागील 3 दिवसात सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2014 तिमाहीत सेन्को गोल्ड कंपनीच्या उत्पन्नात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 39 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
मागील एका वर्षात सेन्को गोल्ड कंपनीने 4 नवीन शोरूम देखील लाँच केले आहेत. सध्या या कंपनीकडे एकूण 159 शोरुम आहेत. मार्च तिमाहीत सेन्को गोल्ड कंपनीची SSSG वाढ 23 टक्के नोंदवली गेली आहे. सध्या बैसाखी, अक्षय्य तृतीया आणि लग्नाचा हंगाम सुरू असल्याने सेन्को गोल्ड कंपनीला फायदा होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.