 
						Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली झाली आहे. नुकताच सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने आपल्या EV चार्जर कंपोनंट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत तंत्रज्ञान भागीदारी केल्याची माहिती दिली आहे. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
या भागीदारीमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अत्याधुनिक उत्पादन सुविधा केंद्र उभारणार आहे. तसेच पीएलसी कंट्रोल सर्किट्स आणि पॉवर मॉड्यूल्सचे उत्पादन देखील करणार आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 78.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी आपल्या नवीन उत्पादन केंद्रातून सुरुवातीला वार्षिक 24,000 पॉवर मॉड्यूलचे उत्पादन करणार आहे. ही क्षमता वार्षिक 2.4 लाख पॉवर मॉड्यूल्सवर नेली जाईल. सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीने आपल्या स्केलेबल स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून वाढत्या ईव्ही चार्जिंग मार्केटमधील मोठा वाटा काबीज करण्याची योजना आखली आहे.
सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे नवीन उत्पादन प्लांट डिसेंबर 2024 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या मते, हा उपक्रम आयात केल्या जाणाऱ्या घटकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि भारतात उच्च कुशल नोकऱ्यांची निर्मिती तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढीसाठी थेट योगदान देणार आहे.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 86.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3,304.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4,345 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 313.89 टक्के परतावा कमावून दिला आहे.
YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये 88 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 100 रुपये किमतीवर या स्टॉकमध्ये प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 100 रुपये किमतीचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला तर अल्पावधीत शेअर 112 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		