
SG Mart Share Price | एसजी मार्ट कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 7 वर्षात करोडपती बनवले आहे. एसजी मार्ट कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 30000 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 8436.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
6 ऑक्टोबर 2016 रोजी एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 28.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमती वरून हा स्टॉक तब्बल 29,293.90 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के घसरणीसह 8,267.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 29.293.90 टक्क्यांनी वाढून 2.93 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 35,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 29,293.90 टक्क्यांनी वाढून 1.2 कोटी रुपये झाले असते.
2023 या वर्षात सुरुवातीपासून एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1,955.07 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1,433.97 टक्के परतावा कमवून दिला आहे. मागील 5 वर्षांत एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत 7,877.35 टक्के वाढली आहे.
मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये एसजी मार्ट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. एसजी मार्ट कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8780.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 8536.05 रुपये होती. एसजी मार्ट ही कंपनी मुख्यतः नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,374.42 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.