
Shish Industries Share Price | शीश इंडस्ट्रीज कम्लनी शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 165 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे.
शिश इंडस्ट्रीज कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी शीश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.012 टक्के वाढीसह 400.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बोनस शेअर्स डिटेल
शिश इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले दोन बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे शीश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 400.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर इंट्रा-डे सेशनमध्ये या कंपनीने 406 रुपये उच्चांक किंमत स्पर्श केली होती.
मागील एका महिन्यात शीश इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 11.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 167.21 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 वर्षात या शेअरने 2,699.93 टक्के परतावा दिला
मागील एका वर्षात शीश इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 122.81 टक्के वाढले आहेत. तर मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 2,699.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. शिश इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 235 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.