
Shriram Properties Share Price | श्रीराम ग्रुपचा भाग असलेल्या श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट तेजीत धावत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 86.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ गुंतवणुकीच्या बातमीमुळे पाहायला मिळाली होती.
श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 94.10 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 53.25 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 85.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच या कंपनीने रियल्टी प्रकल्पासाठी 206 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. श्रीराम प्रॉपर्टीज आणि ASK प्रॉपर्टीज फंड यांनी चेन्नईमधील प्रकल्पाच्या 100 टक्के विकास हक्कांसाठी 206 कोटी रुपये संयुक्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक श्रीराम प्रॉपर्टीज कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी Sreevision Elevations तर्फे केली जाणार आहे. या प्रकल्प संपादनाची प्राथमिक औपचारिकता पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प मंगडू याठिकाणी स्थित असून तो पौरूर-मन्नापक्कम आयटी क्लस्टर आणि मेट्रो कॉरिडॉरपासून खूप कमी अंतरावर आहे.
या रिअल्टी प्रकल्पातील एकूण विक्रीयोग्य क्षेत्र 1.9 दशलक्ष चौरस फूट असून दोन भागात विस्तारलेले आहे. या प्रकल्पातून पुढील पाच वर्षांमध्ये 1,200 कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते अशी माहिती कंपनीने दिली आहे. या स्थावर प्रकल्पात एकूण 1900 निवासी घरे बांधली. आणि कंपनी या प्रकल्पाद्वारे मध्यम उत्पन्न गटाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
श्रीराम प्रॉपर्टीज आणि एएसके प्रॉपर्टी फंड यांनी या पूर्ण प्रकल्पाचे संपादन करण्यासाठी 206 कोटी रुपयेची संयुक्त गुंतवणूक केली असल्याची प्राथमिक माहिती जाहीर केली आहे. या प्रकल्पाचे काम काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची गरज स्वतंत्रपणे पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.