
Sintex Plastics Share Price | ‘सिंटेक्स ब्रँड’ चे उत्पादन बनवणाऱ्या प्रसिद्ध ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर मध्ये घसघशीत वाढ होत आहे. स्टोरेज टँक, इंटिरियर, इलेक्ट्रिकल आणि एसएमसी उत्पादने बनवणाऱ्या ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 2.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘सिंटेक्स प्लॅस्टिक’ कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून सातत्याने घसरत होते. आता अचानक या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 2.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सिंटेक्स प्लॅस्टिक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1.79 रुपये होती. (Sintex Plastics Limited)
शेअरमध्ये बंपर तेजी :
मागील 5 दिवसात ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरमध्ये 23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. Sintex Plastics Technology कंपनीचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये 1.95 रुपयांवरून वाढून 2.39 रुपयांवर पोहचले आहे. या कालावधीत ‘सिंटेक्स प्लॅस्टिक’ कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे 23 टक्के वाढली आहे. ‘सिंटेक्स प्लॅस्टिक’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 152 कोटी रुपये आहे. या वर्षी आतापर्यंत, सिंटेक्स प्लास्टिक टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 16 टक्के कमजोर झाले आहेत, कारण सिंटेक्स प्लास्टिक कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे.
सिंटेक्स प्लास्टिक ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जाते आहे. नुकताच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच NCLT ने ‘सिंटेक्स प्लास्टिक टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची याचिका स्वीकारली होती. एनसीएलटीच्या अहमदाबाद खंडपीठाने ‘अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी’ ने दाखल केलेला दिवाळखोरीचा अर्ज स्वीकारला आणि कंपनीवर दिवाळखोरी प्रक्रिया सुरू केली. या याचिकेमध्ये ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीवर 350.28 कोटी रुपये कर्ज थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यापैकी 215.77 कोटी रुपये मुद्दल आणि 134.50 कोटी रुपये व्याज रक्कम थकीत आहे. सिंटेक्स प्लॅस्टिक कंपनीच्या विरोधात दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कंपनीने BAPL ला कर्जाचे कॉर्पोरेट हमीदार बनवले होते. वेलस्पन ग्रुपने नुकताच ‘सिंटेक्स बीएपीएल’ ला 1251 कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण केले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.