
SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी शेअर तेजीत वाढत आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे राजस्थान सरकारकडून मिळालेला मोठा (NSE: SJVN) कॉन्ट्रॅक्ट आहे. एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला ७ गिगावॅटचा प्रोजेक्ट विकसित करण्यासाठी मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देणारा शेअरमध्ये मागील काही महिन्यांपासून सुस्ती दिसून आली होती. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)
एसजेव्हीएन शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी एसजेव्हीएन शेअर 4.17 टक्के वाढून 107.75 रुपयांवर पोहोचला होता. काही काळानंतर एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचा शेअर 6 टक्क्यांहून अधिक वाढून 107.75 रुपयांवर पोहोचला आहे. एसजेव्हीएन शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. एसजेव्हीएन शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 161.45 रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 80.20 रुपये प्रति शेअर आहे. एसजेव्हीएन कंपनीचे एकूण मार्केट कॅप 42,206 कोटी रुपये आहे.
कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स
एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले आहे की, ‘राजस्थान सरकारकडून एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला ७ गिगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये ५ गिगावॅट पंप आणि २ गिगावॅट फ्लोटिंग सोलर प्रकल्पाचा समावेश आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम
एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीची आर्थिक स्थिती भक्कम आहे. दुसऱ्या तिमाहीत एसजीव्हीएन लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ४४१.१४ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा निव्वळ नफा ४३९.६४ कोटी रुपये होता.
शेअरने 336.92% परतावा
गेल्या 6 महिन्यांत एसजेव्हीएन शेअर 26.33% घसरला आहे. मागील १ वर्षात एसजेव्हीएन शेअरने 32.88% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एसजेव्हीएन शेअरने 336.92% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 336.03% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एसजेव्हीएन शेअरने 15.93% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.