14 June 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

TTML Share Price | टाटा समूहातील कंपनीचा शेअर 66 टक्के स्वस्त झालाय, नेमकं काय घडतंय? खरेदी करावे की विकावे शेअर्स?

TTML Share price

TTML Share Price | टाटा उद्योग समूह हा भारतातील एक प्रसिद्ध आणि सर्वात मोठा उद्योग समूह मानला जातो. मात्र या उद्योग समूहात एक कंपनी आहे, जिच्या शेअरने मागील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. एकेकाळ होता जेव्हा हा स्टॉक तेजीत सुसाट धावत होता. मात्र आता हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 66 टक्के कमजोर झाला आहे.

टाटा समूहाचा भाग असलेला हा स्टॉक 11 जानेवारी 2022 रोजी 291.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 291.05 रुपये ही स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत होती. आपण ज्या शेअरची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे,”टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड/टीटीएमएल असे आहे. सध्या टीटीएमएल कंपनीचा स्टॉक 99.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2022 या वर्षी TTML कंपनीचा स्टॉक YTD आधारे 54 टक्के पडला आहे.

YTD आधारे स्टॉक 54 टक्के तुटला :
एकेकाळी TTML कंपनीचे स्टॉक 216 रुपयांवर ट्रेड करत होते, आणि आता स्टॉक 99.25 रुपयापर्यंत पडला आहे. म्हणजे ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केली होती, त्या लोकाचे गुंतवणूक मूल्य आता 45000 वर आले आहे. त्याचवेळी कंपनीच्या शेअरची उचांक किंमत पातळी 291.05 रुपये आहे, ज्यां लोकांनी उच्चांक किंमत पातळीवर 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांची गुंतवणूक आता 33000 झाली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये TTML कंपनीचा स्टॉक 5 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी , हा स्टॉक गेल्या एका वर्षात सुमारे 18 टक्के मजबूत झाला होता. TTML ही कंपनी टाटा समूहाचा भाग असून ही एक लार्ज कॅप कंपनी आहे.

TTML कंपनी Tata Teleservices या कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून काम करत आहे. TTML कंपनी व्हॉईस सेवा आणि डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीकडे मोठ्या ग्राहक असून कंपनीचा व्यापार ठीत वाढत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते मागील एका महिन्यात TYML कंपनीने आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा लाँच केली होती. आपल्या ग्राहक कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण प्रदान करत असल्याने TTML कंपनीला मार्केटमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| TTML Share price has fallen down on lower level price on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x