13 December 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

Stock in Focus | होय! गुंतवणूकदारांचं आयुष्य बदलणारे हे 3 टॉप शेअर्स खूप स्वस्त झाले आहेत, आता खरेदी करावे का?

Stock in Focus

Stock in Focus | 2022 हे वर्ष काही दिवसांनी संपणार आहे. भारतीय शेअर बाजारात या वर्षी जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात यंदा काही नवे विक्रमही पाहायला मिळाले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा आपली विक्रिमी उच्चांक पातळी स्पर्श केली होती. त्याचवेळी, अनेक सेक्टरमध्ये मजबूत वाढ पाहायला आहे, तर दुसरीकडे अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. असे काही सेक्टर देखील आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना निराशही केले आहे. या शेअर्स ने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. वास्तविक, शेअर बाजारात या वर्षी आयटी क्षेत्रात जबरदस्त मंदी पाहायला आहे. निफ्टी आयटी इंडेक्सचे प्रदर्शन या वर्षी खूप कमजोर होते. त्याच वेळी तीन दिग्गज आयटी कंपन्यानी देखील आपल्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले आहे. चला तर जाणून घेऊ या कंपनीच्या कामगिरीबद्दल

IT share prices :
2022 या वर्षात Infosys, TCS आणि Wipro या आयटी कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना घोर निराश केले आहे. या वर्षभरात हे आयटी स्टॉक नकारात्मक कामगिरी करत होते. शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव वाढला होता. त्यामुळे शेअर्स सतत पडत होते. विप्रो कंपनीची अवस्था सर्वात वाईट दिसून आली आहे. विप्रोचे शेअर्स या एका वर्षात निम्म्या किमतीवर आले आहेत.विप्रोच्या शेअरमध्ये अजूनतरी रिकव्हरी पाहायला मिळत नाही आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

TCS Share Price :
टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअर्समध्येही कमजोरी पाहायला मिळाली आहे. 2022 या चालू वर्षात TCS कंपनीचा स्टॉकमध्ये 15 टक्क्यांनी पडला आहे. NSE निर्देशांकावर TCS कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4043 रुपये होती. तर या वर्षी TCS स्टॉकने 2926.10 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती, आणि आज TCS कंपनीचा स्टॉक 3205 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

Infosys Share Price :
इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीने ही आपल्या शेअर धारकांना 2022 या वर्षात निराश केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये सतत पडझड सुरू आहे. शेअर वर विक्रीचा प्रचंड दबाव असून शेअर मागील एका वर्षापासून नकारात्मक रिटर्न्स देत आहे. 2022 च्या सुरवातीला इन्फोसिस कंपनीच्या शेअरने NSE निर्देशांकावर 1953.90 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1355 रुपये आहे. एका वर्षात या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. आज हा स्टॉक 1510 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

Wipro Share Price :
विप्रो कंपनीच्या शेअरने या वर्षी आपल्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये लाल रंग पसरवला आहे. या एका वर्षात स्टॉक इतका पडला आहे की, शेअरची किंमत निम्म्यावर आली आहे. अजूनही शेअरमध्ये रिकव्हरी पाहायला मिळत नाही आहे. या वर्षी विप्रोची NSE निर्देशांकावर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 726.80 रुपये होती. दुसरीकडे विप्रो शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 372.40 रुपये आहे. चालू वर्षात विप्रो कंपनीच्या शेअरमध्ये 45 टक्के पेक्षा अधिक पडझड खाली आहे. आज हा स्टॉक किंचित वाढीसह हिरव्या निशाणीवर 389.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top 3 IT Stock has given huge negative returns to shareholders in this year and still price is not recovered on 19 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x