20 September 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, ब्रेकआउटचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. पॉवर सेक्टरमधील कंपनीचे शेअर्स मजबूत ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या जर तुम्ही अल्पकालीन गुंतवणुकीसाठी स्टॉक शोधत असाल तर एसजेव्हीएन स्टॉक खरेदी करा. हा स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी हा स्टॉक तीन महिन्यासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

मागील 3 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मागील एका वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 225 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.93 टक्के वाढीसह 141.71 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक तीन महिन्यासाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी एसजेव्हीएन स्टॉक 129-133 रुपये रेंजमध्ये खरेदी केला पाहिजे. गुंतवणूक करताना 122 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील तीन महिन्यात 151 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील तीन दिवसांत हा स्टॉक 131 रुपयेवरून वाढून 142 रुपये किमतीवर पोहचला आहे.

5 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 171 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 3 दिवसांपासून एसजेव्हीएन स्टॉक प्रचंड व्हॉल्यूमसह ब्रेकआउट देत आहे. ब्रेकआऊटच्या माध्यमातून हा स्टॉक अपट्रेंडचे संकेत देत आहे. नुकताच एसजेव्हीएन स्टॉकने 20 दिवसाचा आणि 50 दिवसाचा EMA म्हणजेच एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग ॲव्हरेज ओलांडला आहे. यावरून हा स्टॉक अपट्रेंडमध्ये वाढू शकतो, असे संकेत मिळत आहेत. मागील एका आठवड्यात एसजेव्हीएन स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 06 July 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x