
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी जलविद्युत कंपनीने आपले जानेवारी-मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीसाठी कंपनीने 61.1 कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 17.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
एसजेव्हीएन कंपनीकडे मार्च तिमाहीत 16 कोटीं रुपयेचे टॅक्स क्रेडिट होते. तर एका वर्षभरापूर्वीच्या कालावधीत या कंपनीचा टॅक्स खर्च 40 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या कालावधीत कंपनीचा महसूल 4.1 टक्के घसरणीसह 482.9 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 3.87 टक्के घसरणीसह 134.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एसजेव्हीएन कंपनीचा EBITDA मागील वर्षीच्या तुलनेत 22.1 टक्के घसरून 239.7 कोटी रुपयेवर आला आहे. कंपनीचा EBITDA मार्जिन 1,200 बेस पॉइंट्सने घसरून 49.6 टक्के नोंदवला गेला आहे.
मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा EBITDA मार्जिन 61.3 टक्के होता. मागील आर्थिक वर्षातील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मार्च 2024 तिमाहीत कंपनीचे मार्जिन 50 टक्केच्या खाली गेले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एसजेव्हीएन कंपनीचे अक्षय ऊर्जा विक्रीमधील योगदान 106.8 कोटी रुपये होते. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 68 कोटी रुपये होते.
एसजेव्हीएन कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 0.65 पैसे अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स बुधवारी 2 टक्के वाढीसह 141.50 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील सहा महिन्यांत एसजेव्हीएन स्टॉक 65 टक्के वाढला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 290 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 448.72 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी किंमत 170.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 35.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 54,879.59 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.