21 May 2024 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र आज स्टॉक किंचित तेजीत व्यवहार करतोय. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, अल्पावधीत अशोक लेलँड स्टॉक 210 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. इतर ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी देखील हा स्टॉक 230 रुपये किमतीच्या पार जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 2.23 टक्के वाढीसह 199 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अशोक लेलँड कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 205.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 144.20 रुपये होती. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एसएमसी ग्लोबलने अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मागील आठवड्यात या शेअरने 190 रुपये किमतींचा ब्रेकआउट तोडला होता. आता तज्ञांनी हा स्टॉक 175 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज फर्म SMC ने अशोक लेलँड कंपनीच्या शेअरसाठी 230-232 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. व्यावसायिक वाहन उत्पादक अशोक लेलँड कंपनीच्या घाऊक विक्रीत एप्रिल महिन्यात 10 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात कंपनीने 14,271 युनिट विकले होते. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 12,974 युनिट विकले होते.

एप्रिल 2023 मधील 12,366 युनिट्स विक्रीच्या तुलनेत एप्रिल 2024 मध्ये अशोक लेलँड कंपनीची देशांतर्गत विक्री नऊ टक्के वाढीसह 13,446 युनिट्सवर पोहोचली आहे. अशोक लेलँड कंपनीची देशांतर्गत बाजारपेठेतील मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांची विक्री 16 टक्क्यांच्या वाढीसह 8,611 युनिट्सवर पोहचली आहे. मागील वर्षीच्या याच महिन्यात कंपनीची देशांतर्गत विक्री 7,422 युनिट्स नोंदवली गेली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 10 May 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x