
SJVN Vs NHPC Share Price | गुरुवार 31 ऑक्टोबर 2024 रोजी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण झाली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी, एसजेव्हीएन आणि एनटीपीसी मधील गुंतवणुकीची रणनीती स्पष्ट केली आहे. या तीन शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
NHPC Share Price
शेअर बाजारातील काही शेअर्समध्ये अचानक मोठी तेजी आली होती. ही थोडी चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कारण पुन्हा या शेअर्समध्ये थोडी घसरण होऊ शकते. NHPC शेअर ८२ ते ८३ रुपयांच्या रेंजमध्ये टिकून असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र NHPC शेअरमध्ये ८८-९० रुपयांच्या पातळीवर रिकव्हरीचे संकेत दिसत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. NHPC शेअरला ७२ रुपयांच्या पातळीवर सपोर्ट आहे असं देखील तज्ज्ञांनी सांगितले आहे. मागील १ वर्षात या शेअरने 66.55% परतावा दिला आहे. तसेच मागील ५ वर्षात या शेअरने 250.81% परतावा दिला आहे.
SJVN Share Price
ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, ‘SJVN शेअर्स गुंतवणूकदारांचा उद्देश शॉर्ट टर्मचा असेल तर शेअर्स खरेदी करू नयेत, जोपर्यंत SJVN लिमिटेड कंपनी शेअर १३० रुपयांच्या वर येत नाही. मागील १ महिन्यात SJVN शेअर 13.25% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 59.75% परतावा दिला आहे.
NTPC Share Price
ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, ‘लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून एनटीपीसीच्या शेअरमध्ये मोठ्या वाढीची क्षमता आहे. एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांनी ३९८ रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिल आहे. तसेच एनटीपीसी शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. मागील १ वर्षात या शेअरने 75.54% परतावा आहे. तसेच मागील ५ वर्षात या शेअरने 236.05% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.