
Smart Investment | केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. दरम्यान स्त्री सशक्तीकरणासाठी विविध योजना देखील सुरू असतात. खास मुलींसाठी अशीच केंद्र सरकारची आणखीन एक फायद्याची योजना सुरू आहे. या योजनेचं नाव ‘सुकन्या समृद्धी योजना’ असं आहे. मुलीला 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी चांगले पैसे देखील मोजावे लागतात.
त्याचबरोबर मुलगी वयात आली की, बापाच्या जीवाला तिच्या लग्नाचं टेन्शन येतं. अशातच प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न देखील अगदी थाटामाटात पार पडलं पाहिजे. या सर्व गोष्टींची चिंता आता मिटणार आहे. कारण की, सुकन्या समृद्धी योजनेमार्फत तुम्ही तुमच्या लेकीच्या आणि स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकणार आहात. ही योजना कशा पद्धतीने काम करते पाहूया.
केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेअंतर्गत ‘सुकन्या समृद्धी योजना’ चालू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या मुलीचं अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये जाऊन खातं उघडावं लागेल. लक्षात असू द्या की, खात उघडण्यासाठी मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे.
योजनेची परिपूर्ण माहिती :
या योजनेमध्ये मुलीचं खातं उघडण्यासाठी आई-वडिलांचं भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे. सोबतच पैसे गुंतवण्यासाठी पूर्ण 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे देखील आवश्यक आहे.
गुंतवणुकीची अट
या योजनेच्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये वर्षाला 250 रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते आणि वर्षाला दीड लाखांपेक्षा अधिक गुंतवणूक करता येणार नाही. तुमच्या मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जमा असलेल्या रक्कमेच्या 50% रक्कम तुम्ही काढू शकता. सोबतच तुमची मुलगी 21 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिचं अकाउंट मॅच्युअर होतं. म्हणजेच तुम्ही संपूर्ण पैसे व्याजासकट काढू शकता.
व्याजदराची किंमत
सध्या या योजनेत 8.20% व्याजदर दिले जातय. दिला गेलेला व्याजदर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलत राहण्याची शक्यता असते. जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला चक्रवाढ व्याज देखील मिळते. सोबतच तुम्ही दीड लाखांपर्यंत गुंतवणूक केली असेल तर, कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळते.
समजण्यासाठी उदाहरण
समजा एखाद्या व्यक्तीची मुलगी दोन वर्षांची आहे आणि तिचं या योजनेमध्ये खातं उघडलं आहे आणि प्रत्येक वर्षी 14 हजार रुपये तिच्या अकाउंटमध्ये जमा केले जात आहेत. तर, 15 वर्षानंतर ही अमाऊंट 2,10,000 रुपये एवढी होते. 8.20% व्याजदरानुसार 4,36,574 रुपये मिळतात आणि तुमच्या हातात टोटल अमाऊंट 6,46,574 एवढी अमाउंट येते.
महत्त्वाचं
जर तुम्हाला हे खातं नको हवं असेल आणि बंद करायचं असेल तर, ही तीन कारण गरजेची आहेत.
1) मुलीचं अचानक निधन झाल्यामुळे खातं बंद केलं जाऊ शकतं.
2) आर्थिक संकटांमुळे आणि हालाकीच्या परिस्थितीमुळे अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन खातं बंद केलं जाऊ शकतं.