3 May 2025 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News

Smart Investment

Smart Investment | प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची त्यांच्या भविष्याची फारच काळजी असते. आपलं मूल 21 वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याला शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये एवढी माफक इच्छा पालकांची असते. त्याचबरोबर मुलींसाठी त्यांच्या शिक्षणासाठी देखील आई वडील जागरूक असतात.

आपल्या मुलीनं उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागावं असं आई-वडिलांना वाटतं. परंतु त्यासाठी चांगल्या पैशांचं नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला मुलगी लहान असतानाच तिच्यासाठी पैसे जमवत रहावे लागतील. आज आम्ही तुम्हाला एका योजनेविषयी माहिती देणार आहोत. या योजनेमुळे तुमच्या लेकीच्या शिक्षणाची तसेच लग्नाच्या खर्चाची काळजी पूर्णपणे मिटेल.

सुकन्या समृद्धी योजना :
केंद्र सरकारने 2015 साली भारतवासीयांसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. आतापर्यंत अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत सरकार 8.2 % ने वार्षिक व्याजदर देत आहे. ही योजना एक अल्पबचत योजना असून इतर अल्पबचत योजनांपेक्षा जास्त व्याजदर देणारी योजना आहे. विशेष म्हणजे कलम 80C अंतर्गत या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना कर सवलत मिळते.

ही योजना कर कपातीसाठी पात्र असून 1.5 लाख एवढी कमाल मर्यादा आहे. या योजनेची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना मुलीच्या 21व्या वर्षापर्यंत सुरू राहील. जर तुम्ही मुलगी पाच वर्षाची असताना तिचं खातं उघडलं तर, ती 26 वर्षांची झाल्यावर हे खातं मॅच्युअर होईल.

गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन :
समजा तुम्ही तुमच्या मुलीच्या पाचव्या वर्षी तिचं खातं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत उघडलं तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत. दरमहा 8.2% व्याजदराने 1.5 लाख रुपये म्हणजेच महिन्याचे दहा हजार. या हिशोबाने तुम्ही पैसे गुंतवत असाल तर, 21 वर्षानंतर तुमच्या खात्यामध्ये 55.61 लाख रुपये जमा होतील. यामधील तुम्ही गुंतवलेली रक्कम 17.93 लाख रुपये असून 21 वर्षापर्यंतची व्याजाची रक्कम 37.68 लाख रुपये एवढी असेल. त्याचबरोबर जर तुम्ही दीड लाख रुपये गुंतवताच आले तर, मॅच्युरिटी अमाऊंट 69.8 लाख रुपये एवढी रक्कम जमा होईल. म्हणजेच 22.5 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला मिळणारी व्याजाची रक्कम 47.3 लाख रुपये एवढी असेल.

Latest Marathi News | Smart Investment for good return 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Smart Investment(102)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या