
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5.29 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीसह ट्रेड करत होते. सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50470 कोटी रुपये आहे.
सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5681 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3453 रुपये होती. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी सोलर इंडस्ट्रीज स्टॉक 1.19 टक्के वाढीसह 6,012 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 6 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 13 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जुलै 2023 रोजी सोलर इंडस्ट्रीज स्टॉक 3544 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. तर नीचांक किंमत पातळीपासून हा स्टॉक आता 60 टक्के वाढला आहे.
सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3912 कोटी रुपये आहे. परकीय आणि देशांतर्गत गुंतवणूकदार या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत आहेत. नुकताच सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीला 1853 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. सोलर इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः बल्क एक्सप्लोसिव्ह, पॅकेज एक्स्प्लोझिव्ह आणि इनिशिएटिव्ह सिस्टम बनवण्याचे काम करते.
सोलर इंडस्ट्रीज कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. या तिमाहीत कंपनीने 11.17 टक्क्यांच्या वाढीसह 210 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सोलर इंडस्ट्रीज कंपनीच्या एकूण महसूल संकलनात 14 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या कंपनीला कोल इंडिया लिमिटेड कंपनीने 1853 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
9 नोव्हेंबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 1013 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर अवघ्या 5 वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 452 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 2 मे 2014 रोजी सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 221 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 एप्रिल 2006 रोजी या कंपनीचे शेअर्स 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुरुवातीपासून आतपर्यंत सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 11532 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.