14 December 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

आगामी वर्षात सिडको जाहीर करणार 65 हजार घरांसाठी विक्रमी सोडत

CIDCO housing lottery, next year, Mega scheme, Sanjay Mukherjee

मुंबई, २१ नोव्हेंबर: प्रधानमंत्री आवास योजनेतील (Pradhan Mantri Awas Yojana) ‘सर्वांसाठी घर’ या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सिडको (CIDCO Housing) कडून लाखो घरं उभारण्यात येणार आहेत. मुंबई, नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी त्यासाठी काम सुरू आहे. दरम्यान सिडको नववर्षामध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल 65,००० घरांची एकत्र सोडत जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात सोडत जाहीर करण्याची ही पहिलीच असल्याने अनेक सर्वसमान्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्कांचं घर घेण्यासाठी पर्याय खुला होणार आहे.

सध्या सिडको कडून तळोजा, कलंबोली, घणसोली, द्रोणागिरि इथे १४ हजार ८३८ घरांच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. कालच या घरांच्या आणि सिडकोच्या कामाची पाहणी करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी स्वतः साईट्सवर गेले होते. यावेळेस त्यांनी २०२१ मध्ये सिडकोकडून ६५ हजार घरांची सोडत जाहीर करू असे सांगितले आहे.

सिडकोची घरं नेमकी कुठे असतील?
सिडकोकडून आगामी वर्षात वाशी ट्रक टर्मिनल्स, खारघर रेल्वेस्थानक, खारघर बस स्थानक, कळंबोली बस स्थानक, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल बस आगार, खांदेशवर, मानसरोवर, तळोजा, जुईनगर, नेरूळ, सानपाडा, सीबीडी बेलापूर, बामणडोंगरी अशा 27 महत्तवाच्या जागी 90 हजार घरं उभारली जाणार आहेत. सिडकोच्या महागृहनिर्माण प्रकल्पातील भाग्यवान ग्राहकांना घराचा ताबा मार्च 2021 पर्यंत मिळणार आहे.

 

News English Summary: Millions of houses will be constructed by CIDCO Housing in line with the Pradhan Mantri Awas Yojana’s ‘Home for All’ objective. Work is underway in several places in Mumbai, Navi Mumbai. Meanwhile, CIDCO will announce the release of 65,000 houses in the first phase of the new year. Meanwhile, as this is the first time that such a large-scale release has been announced, it will open the door for many commo peoples to take up their dream home.

News English Title: CIDCO housing lottery next year bring out a mega scheme of 65 thousand houses in first phase News Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x