
Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये बंपर परतावा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
एवढेच नाही तर मागील 10 वर्षांमध्ये सोनाटा सॉफ्टवेअर कंपनी शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4300 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 1,036.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 488 टक्के वाढले आहे. सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीने मागील एका वर्षात लोकांना 95.46 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 78.8 टक्के वाढली आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 1039.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 4 लाख रुपये झाले आहे. म्युच्युअल फंड आणि सार्वजनिक गुंतवणूकदारानी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे 13.57 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.