
South Indian Bank Share Price | साउथ इंडियन बँकेच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच साउथ इंडियन बँकेने आपले ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत साउथ इंडियन बँकेने 305.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत साउथ इंडियन बँकेने 102.75 कोटी रुपये निव्वळ कमावला होता. म्हणजेच मागील एका वर्षात साउथ इंडियन बँकेच्या निव्वळ नफ्यात 197.42 टक्के वाढ झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 31.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 31.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी हा बँकिंग स्टॉक 28.38 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मार्च 2023 मध्ये साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 13.79 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात साउथ इंडियन बँकेचे शेअर्स 66 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
साउथ इंडियन बँकेत 100 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणूकदारांनी होल्ड केले आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत साउथ इंडियन बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच एनपीए 4.74 टक्के नोंदवली गेली होती. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 5.48 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवली गेली होती. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये साउथ इंडियन बँकेचा निव्वळ एनपीए 1.61 टक्के होता, जो वार्षिक आधारावर वाढून 2.26 टक्क्यांवर पोहोचला आहे.
साऊथ इंडियन बँकेच्या एमडी आणि सीईओनी एका निवेदनात म्हंटले की, “साउथ इंडियन बँकेने अवलंबलेले व्यावसायिक धोरण बँकेच्या कामगिरीमध्ये होणारी सुधारणा योग्य दिशेने घेऊन जात आहे. साउथ इंडियन बँकेने कॉर्पोरेट, एसएमई ऑटो लोन, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज या मालमत्तेच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून आपल्या सर्व विभागांची भरघोस वाढ केली आहे”.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.