 
						Spicejet Share Price | स्पाइसजेट एअरलाइन कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 70.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण झाली होती. आज देखील स्पाइसजेट कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहे.
या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच 316 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. स्पाइसजेट कंपनीने प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून जमा केलेली एकूण रक्कम 1,060 कोटी रुपये झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी स्पाइसजेट कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के वाढीसह 67.41 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्पाईसजेट कंपनीच्या संचालक मंडळाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी ॲरीज अपॉर्च्युनिटीज फंड लिमिटेडसह इतर दोन गुंतवणूकदारांना 4.01 कोटी प्रेफरन्स शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली होती. या माध्यमातून स्पाइसजेट कंपनीने एकूण 1,060 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. या भांडवल उभारणीमुळे स्पाइसजेट कंपनीला व्यवसाय विस्तार योजनांची पूर्ती करण्यास मदत होणार आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत स्पाइसजेट एअरलाइन कंपनीकडे एकूण 65 विमानांचा ताफा होता. यापैकी फक्त 35 विमाने सेवेत आहेत.
चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, स्पाईसजेट कंपनीचे शेअर्स सध्या 60 रुपये ते 75 रुपये किमती दरम्यान ट्रेड करत आहेत. जर स्टॉकने हा बॅरियर ओलांडला तर या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढू शकतात. तज्ञांनी स्पाइसजेट स्टॉक खरेदी करताना 60 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		