
Sprayking Agro Equipment Share Price Today | ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीने 2 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 6 महिन्यात या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के वाढीसह 145.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Sprayking Agro Equipment Limited)
बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख :
‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, “‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनी आपल्या विद्यमान धरे धारकांना प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. कंपनीमे या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट म्हणून 3 मे 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
पूर्वी बोनस जारी करण्याची रेकॉर्ड तारीख 25 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली होती. मात्र 18 एप्रिल 2023 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने रेकॉर्ड डेटमध्ये बदल केला आहे. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 87.82 कोटी रुपये आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 138.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 11 नोव्हेंबर 2022 पासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 556.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात ‘स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 212.50 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 138.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 20.10 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून 50.05 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 36.41 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी एकूण 63.59 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.