12 December 2024 8:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 3 टक्के वाढीसह 164.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आयआरईडीए कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने गिफ्ट सिटी, गांधीनगर, गुजरात येथे आपले कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय परकीय चलनात कर्जाचे पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे हेजिंग आणि ग्रीन हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा उत्पादन प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे अधिक सोपे होणार आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.93 टक्के घसरणीसह 160 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच सेबीने एक निवेदन जाहीर करून माहिती दिली की, आयआरईडीए कंपनीचे सर्किट फिल्टर 5 टक्केवरून वाढवून 20 टक्के करण्यात आले आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,000 कोटी रुपये आहे. याचा अर्थ आयआरईडीए स्टॉक एका ट्रेडिंग सेशनमध्ये कमाल 20 टक्के वाढू शकतो किंवा खाली येऊ शकतो.

या सरकारी कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात खुला करण्यात आला होता. शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये प्रति शेअर होती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयआरईडीए स्टॉक शेअर बाजारात 57 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 57 रुपये या आपल्या लिस्टिंग किमतीवरून 214 रुपये किमतीवर पोहचले आहे. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 150 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. जर हा स्टॉक 180 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 19 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x