सोशल मीडियावर ‘स्टेशन माष्टर’ हॅश टॅगने मोदींवर होतेय प्रचंड टीका, देशातील प्रत्येक स्टेशनवर झेंडा दाखवणारे मोदी आहेत तरी कुठे? प्रश्नांचा भडीमार

Station Master Trending | ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे सहा ते सात डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. अपडेटनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

कोलकाताजवळील शालीमार स्थानकातून कोरोमंडल एक्स्प्रेस चेन्नई सेंट्रलकडे जात असताना बहांगा बाजार स्थानकात सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातग्रस्त मदत गाड्या घटनास्थळावर रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर वेगाने बचावकार्य करत 300 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी पोहोचून ओडिशा रेल्वे दुर्घटनेच्या बचाव कार्याच्या प्रगतीची माहिती घेतली. तसेच पत्रकारांशी संवाद साधला. या भीषण रेल्वे अपघातामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. हा भीषण रेल्वे अपघात होता की कट? हे अद्याप समजलेलं नाही असं ते म्हणाले.

आता रेल्वे अपघातावर राजकीय वक्तव्येही समोर येऊ लागली आहेत. ही दुर्दैवी घटना असून रेल्वे विभागाने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. रेल्वेने प्रवाशांच्या जीवाला महत्त्व दिले पाहिजे. यापूर्वी रेल्वेमंत्री अशा रेल्वे अपघातांवर राजीनामे देत असत, पण आता कोणीही बोलायला तयार नाही.

समाज माध्यमांवर “Station Master” हॅश टॅग ट्रेंडिंग
दरम्यान, या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर समाज माध्यमांवर जोरदार टीका सुरु झाली आहे. देशातील प्रत्येक स्टेशनवर विशेष पोशाखात हिरवा झेंडा दाखवून ट्रेन सोडणारे ‘स्टेशन माष्टर’ सध्या आहेत कुठे असे प्रश्न उपस्थित करून मोदींचे अनेक फोटो ट्विट केले जातं आहेत. तसेच विशेष फौजफाटा घेऊन स्टेशनवर दिसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या अपघाताच्या ठिकाणी फिरकले सुद्धा नाहीत असे तिखट प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित केले जातं आहेत.

News Title :  Station Master Trend PM Modi after Odisha train accident check details on 03 June 2023.