13 December 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Comrade Appliances Share Price | पहिल्याच दिवशी कॉम्रेड अप्लायन्सेस शेअर्सची धमाकेदार लिस्टिंग, गुंतवणुकदारांची मजबूत कमाई, डिटेल्स पाहा

Comrade Appliances Share Price

Comrade Appliances Share Price | कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीच्या शेअरने 13 जून 2023 रोजी शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली आहे. कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते.

कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 52 ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 92.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IPO तपशील

कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 87 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 70 टक्के वाढले होते. स्टॉक लिस्टनंतर या कंपनीचे शेअर्स अजूनही तेजीत धावत आहेत. कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीचे शेअर्स लिस्टिंग नंतर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. कॉम्रेड अप्लायन्सेस किंमत दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये 91.35 रुपयेवर पोहचली होती.

कॉम्रेड अप्लायन्सस कंपनीचा IPO 31 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर हा IPO 5 जून 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. 4 दिवसाच्या IPO मध्ये हा स्टॉक 80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 2000 शेअर्स जारी केले होते. त्यामुळे गुंतवणूकदाराला एक लॉट खरेदी करण्यासाठी 1,08,000 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Comrade Appliances Share Price today on 14 June 2023.

हॅशटॅग्स

Comrade Appliances Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x