
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 617.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनी अंश )
नुकताच या कंपनीने माहिती दिली आहे की, त्यांना रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आणि नायजेरियाकडून लवकरच एक मोठी ऑर्डर मिळणार आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी स्टॉक 4.27 टक्के वाढीसह 644 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्च 2024 तिमाहीच्या निकालात स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनीने माहिती दिली की, त्यांच्या ऑर्डर बुकचा आकार 8,000 कोटी रुपयेच्या पुढे गेला आहे. यामधे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायजेरियाकडून मिळणाऱ्या ऑर्डर सामील नाहीये. स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीला जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत 488 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
मार्च 2024 तिमाहीत स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढीसह 1,178 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या कंपनीने 29.4 कोटी रुपये सकारात्मक EBITDA नोंदवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 16.1 कोटी रुपये होता.
स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड कंपनीने या कंपनीचे 32.54 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 617.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 253.45 रुपये होती. मागील 12 महिन्यांत स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी कंपनीचे शेअर्स 92 टक्के मजबूत झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.