26 April 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना २.७३ लाख कोटींचा नफा

BSE, NSE, Stock Market, nasdaq, Dowjones

मुंबई: शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी अक्षरश: दिवाळी साजरी केली. सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी उघडलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी सुरुवातीपासून समभागखरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्स उसळत गेला. दिवसभरात ५८१ अंकांनी वधारलेल्या सेन्सेक्सने दिवसअखेरीस ३९८३१चा स्तर गाठला. तर, १५९ अंकांची वाढ साधलेला निफ्टी ११७८६वर स्थिरावला. सेन्सेक्सच्या या दमदार कामगिरीमुळे गुंतवणूकदारांच्या बाजार भांडवलात तब्बल २.७३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

अमेरिका-चीन दरम्यान व्यापार वाटाघाटी सुरू होण्याची सकारात्मक आणि देशांतर्गत बँका आणि कंपन्यांची लक्षणीय सुधारणा दर्शविणारी तिमाही कामगिरी बाजारातील खरेदीचा उत्साह दुणावणारी ठरली. तिमाही तोटय़ात मोठय़ा कपातीसह विक्री कामगिरीत चांगली सुधारणा दर्शविणाऱ्या टाटा मोटर्सच्या समभाग मूल्यात सलग दुसऱ्या व्यवहारात १७ टक्क्यांची मुसंडी गुंतवणूकदारांनी मंगळवारी अनुभवली. मागील काही महिन्यांत मोठी मूल्य-हालचाल दर्शविणाऱ्या टाटा स्टील, येस बँक, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, टेक महिंद्र आणि टीसीएस या समभागांना खरेदीचे पाठबळ मिळाल्याने, त्या समभागांमध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा भावही २.३० टक्क्यांनी वधारला. त्या उलट भारती एअरटेल, कोटक बँक, पॉवरग्रिड आणि स्टेट बँक या समभागांना नफावसुलीचा फटका बसला.

सकाळी ९.१४ वाजता शेअर मार्केट हिरव्या निशाणावर होता. त्यावेळी सेन्सेक्समध्ये २२३.७९ अंक म्हणजेच ०.५६ टक्के वाढ झाली होती, त्यामुळे सेन्सेक्स ४००५५.६३च्या स्तरावर पोहोचला होता. तर निफ्टीतही ९७.०५ अंक म्हणजेच ०.८२ टक्के वाढीसह ११८८३.९० स्तरावर पोहोचला आहे. मंगळवारी सेन्सेक्स ५८२ अंकांनी मजबूत होऊन बंद झाला होता. बाजारात चहूबाजूंनी खरेदीचा उत्साह होता. वाहन कंपन्यांचे शेअर्सही निफ्टीत हिरव्या निशाणावर बंद झाले होते.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x