11 November 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | लग्नानंतर सुनेला पतीची अर्धी संपत्ती आणि सासरच्या घराच्या प्रॉपर्टीत हक्क मिळतो का, लक्षात ठेवा नियम - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS Ashok Leyland Share Price | ऑटो शेअर तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY CIBIL Score | सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर या 4 टिप्स फॉलो करा, लोनसंबंधी कोणतीही अडचण भासणार नाही - Marathi News Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात दिला 67% परतावा, संधी सोडू नका - Penny Stocks 2024 Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
x

नाशिक: लष्कर भरतीच्या ६३ जागांसाठी २० हजार तरुण; भीषण बेरोजगारीचं वास्तव

Indian Army Recruitment, LIC vacancy

नाशिकः नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये लष्कराच्या भरतीसाठी तब्बल ३० हजार तरुण दाखल झाले आहेत. देवळाली कॅम्प येथील ११६ टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी आजपासून लष्कराने भरतीची प्रक्रिया सुरू केलीय. या भरतीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील ९ राज्य व ३ केंद्र शासित प्रदेशातील शेकडो युवक देवळालीत दाखल झाले आहेत.

आज म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पोलिस प्रशासनाकडून ३ अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तरुणांची गर्दी वाढल्याने देवळाली कॅम्प परिसरात गोंधळाचे वातावरण असून नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांनी काठी उगारली तरी पळापळ होत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. यावेळी अनेक तरुण रस्त्याजवळच्या नाल्यात पडत होते. हजारो युवकांची गर्दी पाहून अखेरीस पहाटे चार वाजताच भरतीसाठी प्राथमिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातून आलेल्या तरुणांची भरती होत असून उद्या राजस्थान आणि त्यानंतर अन्य राज्यांची भरती होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया चार ते पाच दिवस चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x