23 April 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

दहशतवाद संपविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा- युरोपियन युनियन शिष्टमंडळातील खासदार

European Union, Jammu Kashimir, Article 370

जम्मू: जम्मू-काश्मीरमध्ये ‘कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात युरिपियन युनियनच्या २३ खासदारांचा एक गट भारताला पूर्ण पाठिंबा देईल, असं या खासदारांपैकी एकाने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं . मात्र यावेळी स्थानिक काश्मिरी माध्यम प्रतिनिधींनी समावेश घेतला नाही. दरम्यान, मंगळवारी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने लष्कराच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक आयोजित केली आणि त्यानंतर डाल सरोवर तलावाकडे जाण्यासाठी निघाले.

जम्मू-काश्मीरला राज्यातील काही भागांत सुरक्षा आणि बंद दरम्यान खासदारांनी भेट दिली. कलम ३७० मधील तरतुदी हटवल्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय संघाने काश्मीरला भेट दिली. ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याची आणि राज्याला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्याची घोषणा केली. युरोपियन युनियनच्या खासदारांनी काश्मीरला भेट दिल्यानंतर, विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान युरोपियन युनियनमधील खासदारांच्या गटामधील एका खासदाराने बुधवारी सांगितले की, ‘आम्ही, आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ कायमस्वरुपी शांतता आणि दहशत संपविण्याच्या प्रयत्नात भारताला पूर्ण पाठिंबा देतो. आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही भारत सरकार आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानतो. या खासदारांना श्रीनगर विमानतळावरून शहरातील एका लक्झरी हॉटेलमध्ये बुलेट प्रूफ वाहनातून नेण्यात आले.

पाच ऑगस्टनंतर काश्मीर खोऱ्याला भेट देणारे हे पहिले परदेशी शिष्टमंडळ आहे. पाच ऑगस्टला भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले व राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन करणारे विधेयक मंजूर केले. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप आगपाखड केली. भारताला इशारे दिले. पण मलेशिया, टर्की आणि चीन वगळता त्यांना कुठल्याही देशाची साथ लाभली नाही.

हॅशटॅग्स

#Kashmir(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x