11 August 2020 9:14 PM
अँप डाउनलोड

जम्मू-काश्मीर: शोपियान चकमकीत २ दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी २ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात मोठी चकमक झाली. उपलब्ध वृतानुसार, भारतीय लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्तपणे पार पाडलेल्या मोहीमत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

दरम्यान, शोपियान परिसरात आतंकवादी लपून बसल्याची माहिती जवानांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर जवानांनी जोरदार शोधमोहीम राबवली. शोध मोहिमेदरम्यान लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक उडाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या वृत्तानुसार, चकमकीनंतर घटनास्थळावरुन एक एके-४७ आणि पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच, ठार करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची ओळख सुद्धा पटली आहे. अलबदर नवाज आणि आदिल अशी ठार करण्यात आलेल्या आतंकवाद्यांची नावं आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#IndianArmy(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x