29 June 2022 7:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
x

कल्याण: ब्रिटीशकालीन व धोकादायक रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात

कल्याण : ब्रिटीशकालीन आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू लागलेला रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या पाडकामाची संपूर्ण तयारी झाली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या तोडकामासाठी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असा तब्बल ६ तासांचा जम्बो ब्लॉक रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. दरम्यान. रेल्वे प्रशासनाने तब्बल ६ तसंच जम्बो ब्लॉक जाहीर केल्याने त्याचा संपूर्ण ताण रस्ते वाहतुकीवर पडण्याची शक्यता आहे. त्यानिमित्त आज सकाळपासूनच वाहतूक आणि शहर पोलीस, केडीएमटी आणि राज्य परिवहन या यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता एक लोकल रवाना झाली असून कल्याणहून सकाळी ९.०९ वाजता एक लोकल रवाना करण्यात आली. तसेच सकाळी ९.३० नंतर कल्याण-डोंबिवली दरम्यान एकही लोकल धावणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. ब्रिटीशकालीन जूना पत्रीपूल शिस आणि लोखंड मिश्रित असल्याने तो तब्बल १२९ टनचा आहे. अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर अनेक पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. त्यादरम्यान हा पूल सुद्धा धोकादायक असल्याचे समोर आल्याने सप्टेंबरपासूनच या पुलावरुन रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक बंद करण्यात आली होती आणि बाजूकडील केडीएमसीच्या उड्डाणपूलावरुन सध्या वाहतूक सुरू आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x