21 October 2019 4:15 PM
अँप डाउनलोड

मराठा आरक्षण: निवडणुकीपूर्वी लाडू भरवणारे हेच ते नेते वैद्यकीय प्रवेश गोंधळानंतर गायब

Devendra fadanvis, Udhav Thackeray, BJP, Shivsena, Loksabha Election 2019

मुंबई : निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणावर मार्केटिंग करून श्रेय घेणारे आणि एकमेकांना केमेऱ्यासमोर लाडू भरवत स्वतःची पाठ थोपटून घेणारे हे भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सध्या मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेपासून लांब आहेत. सध्या मराठा समाजातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत आणि सत्ताधाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा सुटलेला नाही. याच कारणामुळे मराठा समाजातील विद्यार्थी थोड्याच वेळात आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. मागील काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पाडणार आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण मराठा आरक्षणांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार भरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. अण्णाभाऊ पाटील महामंडाळामार्फत विद्यार्थ्यांची फी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या