14 December 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

राष्ट्रावादीचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन, विरोधक आक्रमक

Jayant Patil

Maharashtra Assembly Winter Session | राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवलं.

हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जयंत पाटील यांनी असा निर्लज्जपणा करू नका, असं वक्तव्य केलं.

त्यानंतर जयंत पाटील यांच्या विधानामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात असं वक्तव्य कुणी करू नये, यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली.

जंयत पाटील यांच्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्ष आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर विरोधीपक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे. आमच्या प्रांताध्यक्ष यांच्यासंदर्भात जे घडलं यासंदर्भात तुम्ही गैरसमज करुन घेऊ नका असे म्हणत अजित पवार यांनी सभात्याग केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra state assembly winter session NCP Jayant Patil suspended check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

#Jayant Patil(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x