23 October 2019 11:13 AM
अँप डाउनलोड

उदयनराजेंना धक्का! देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक; साताऱ्याबाबत घोषणा नाही

MP Udayanraje bhosale, Satara MP Udayanraje Bhosale, By Poll Election satara

नवी दिल्ली: महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांसह देशभरातील ६४ मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यासाठीदेखील २१ ऑक्टोबर रोजी मतदान घेतले जाईल आणि २४ ऑक्टोबर रोजी मतदान होईल.

६४ मतदारसंघांपैकी बिहारमधील एक जागा लोकसभेची तर अन्य ६३ जागा विधानसभेच्या आहेत. अरुणाचल प्रदेश (१), बिहार (५), छत्तीसगड (१), आसाम (४), गुजरात (४), हिमाचल प्रदेश (२), कर्नाटक (१५), केरळ (५), मध्य प्रदेश (१), मेघालय (१), ओडिशा (१), पुद्दुचेरी (१), पंजाब (४), राजस्थान (२), सिक्कीम (३), तामीळनाडू (२), तेलंगणा (१) आणि उत्तर प्रदेश (११) या राज्यांमधील मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत सातारा पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे.

भाजपात प्रवेश करताना उदयनराजे भोसले यांनी काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानुसार लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभेसोबत घेण्यात यावी अशीही अट होती. कारण विधानसभा निवडणुकीनंतर कदाचित भारतीय जनता पक्षाच्या पक्षांतर्गत राजकारणातून उदयनराजेंना पोटनिवडणूक कठीण जाऊ शकते अशी भीती उदयनराजेंना होती.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यासाठी पोटनिवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण, लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. भाजता नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजापात प्रवेश केला. त्यामुळे, साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.

उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीसाठी या रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक घेतली जाईल, अशी अपेक्षा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. पण, पोटनिवडणुकीबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याने उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(21)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या