
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 516.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 513.85 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ( स्टर्लिंग अँड विल्सन कंपनी अंश )
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 491.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीचा स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 519.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अशी बातमी पसरली होती की, शापूरजी पालोनजी कंपनीने आपले कर्ज परतफेड करण्यासाठी कंपनीचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कंपनीने ही बातमी फेटाळली होती. 20 मार्च रोजी या कंपनीने 700 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली होती. कंपनीने आपल्या डेटा सेंटर व्यवसायातील काही हिस्सेदारी विकून ही भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे.
स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 646.95 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स 8 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. त्यानंतर शेअर्स प्रॉफिट बुकींगला बळी पडले होते. अवघ्या दीड महिन्यात स्टर्लिंग अँड विल्सन कंपनीच्या शेअरची किंमत आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 20 टक्क्यांनी कमजोर झाली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.