31 May 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचार्टवर कोणते संकेत? स्टॉक रेटिंग बदलली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, ऑर्डरबुक मजबूत झाली, कमाईची मोठी संधी Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 01 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा NMDC Share Price | PSU स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्ममध्ये देणार मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून खरेदीला गर्दी IRB Infra Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 58% परतावा, पुढे तेजी येणार? स्टॉक 'Hold' करावा की Sell?
x

KEC Share Price | हा शेअर मालामाल करणार! कंपनीची ऑर्डरबुक 17500 कोटी झाली, शेअर्स किती वाढणार?

KEC Share Price

KEC Share Price | केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. नुकताच या कंपनीने 1004 कोटी रुपये मूल्याच्या नवीन ऑर्डर्स मिळवल्या आहेत. वार्षिक आधारावर केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या ऑर्डर्स बुकचा आकार 17500 कोटींवर पोहचला आहे. ( केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी अंश )

नुकताच केईसी इंटरनॅशनल कंपनीला ग्लोबल इन्फ्रा इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन फर्मने ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन, सिव्हिल कन्स्ट्रक्शन, रेल्वे आणि केबल्स संबंधित 1004 कोटी रुपये मूल्याच्या नवीन ऑर्डर दिल्या आहेत. आज मंगळवार दिनांक 26 मार्च 2024 रोजी केईसी इंटरनॅशनल स्टॉक 0.49 टक्के वाढीसह 675.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन विभागात भारत तसेच यूएसमध्ये ऑर्डर मिळवल्या आहेत. या ऑर्डर अंतर्गत केईसी इंटरनॅशनल कंपनीला भारतातील ट्रान्समिशन लाइन, सबस्टेशन आणि भूमिगत केबलिंग तसेच अमेरिकेतील टॉवर, हार्डवेअर आणि पोल उभारणीचे काम देण्यात आले आहे.

केईसी इंटरनॅशनल कंपनीला सरकारी कंपनीकडून पॉवर ट्रान्समिशन कंडक्टरच्या पुरवठ्यासाठी पहिली ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच विविध प्रकारच्या केबल्सच्या पुरवठ्यासाठी आणखी एक ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीला पॉवर ट्रान्समिशन कंडक्टरचा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे.

केईसी इंटरनॅशनल कंपनीचे एमडी आणि सीईओ विमल केजरीवाल यांनी माहिती दिली होती की, मिशन ‘रफ्तार’ अंतर्गत कंपनीला सेमी-हाय-स्पीड रेल्वेची ऑर्डर मिळाली आहे. केईसी इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 680 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 769 रुपये या आपल्या 52 आठव्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KEC Share Price NSE Live 26 March 2024.

हॅशटॅग्स

KEC Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x