
Stock in Focus| अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी पूर्वी बॉम्बे बडोदा रोडवेज इंडिया लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. 1995 साली संपूर्ण भारतभर एलपीजी आणि बिटुमेनच्या वाहतुकीचा व्यवसाय करण्याच्या मुख्य उद्देशाने या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः पेट्रोकेमिकल्स पदार्थ जसे की बिटुमेन आणि बिटुमिनस उत्पादने, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस ज्याला आपण एलपीजी म्हणूनही ओळखतो, यांचे उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि पवन मिल्सद्वारे ऊर्जा निर्मितीच्या उद्योगात गुंतलेली आहे.
स्टॉक मार्केटमध्ये ’द बिग व्हेल’ या नावाने प्रसिद्ध असलेले गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे 3,72,128 शेअर्स म्हणजेच कंपनीचा 2.49 टक्के वाटा विकत घेतला आहे.
अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. कंपनीच्या शेअरची किंमत 87 रुपयेवरून 680 रुपयेवर गेली आहे. या शेअरने आपल्या शेअर धारकांना 683 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 745.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. दिग्गज गुंतवणूकदार आशिष काचोलिया यांनी नुकत्याच केलेल्या गुंतवणुकीमुळे स्टॉक प्रकाशाच्या झोतात आला आणि प्रसिद्ध झाला. कारण मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 44 टक्के आणि मागील एका वर्षात 110 टक्के वर गेली आहे.
या कंपनीच्या शेअरने त्याच्या बेंचमार्क निर्देशांक S&P BSE Smallcap ला परतावा देण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. या स्टॉक ने मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 7.74 टक्के आणि मागील एका वर्षात 1.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. या BSE मधील स्मॉलकॅप स्टॉक कंपनीचे बाजार भांडवल 1008 कोटी रुपये आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 745.70 रुपये आहे. तर नीचांक पातळी किंमत 311 रुपये होती. हा स्टॉक मागील बंदच्या तुलनेत सध्या 1.59 टक्के वाढून 691.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.