 
						Stock To Buy | मागील काही महिन्यांपासून साखरेच्या किमतीत वाढ होत आहे, आणि मागणी देखील मजबूत आहे. मात्र साखरेच्या पुरवठ्यात काही समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय भारत सरकारने आता इथेनॉल निर्मितीबाबतही आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता साखर कंपन्यांना अच्छे दिन आले, असे म्हणण्यास हरकत नाही. इथेनॉलमुळे साखर उत्पादन करणाऱ्या मजबूत फायदा होत आहे. (E I D Parry Share Price)
अशीच एक साखर कंपनी आहे, ईआयडी पॅरी इंडिया. या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ईआयडी पॅरी इंडिया कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 545 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी ईआयडी पॅरी इंडिया कंपनीचे शेअर्स 3.17 टक्के वाढीसह 562.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
शेअर टार्गेट प्राईस
आयडीबीआय कॅपिटल फर्मने ईआयडी पॅरी इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 562 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा दिला आहे. तज्ञांनी 495 ते 530 रुपये किमतीवर स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुक करताना नेहमी स्टॉप लॉस लावल्यास संभाव्य नुकसान टाळता येते. म्हणून तांज्ञानी 495 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 2-3 महिन्यांत ईआयडी पॅरी इंडिया कंपनीचे शेअर्स 675 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
EID पॅरी इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 670 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 433 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 9600 कोटी रुपये आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. अवघ्या काही दिवसात 505 रुपयेचा शेअर आज 562 रुपये किमतीवर पोहचला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 11.82 टक्के नफा कमावून दिला आहे.
ईआयडी पॅरी इंडिया ही कंपनी भारतातील पहिली साखर उत्पादन कंपनी म्हणून ओळखली जाते. EID पॅरी इंडिया कंपनीचे मुख्यालय चेन्नई मध्ये असून ती मुरुगप्पा ग्रुपचा भाग म्हणून ओळखली जाते. ईआयडी पॅरी इंडिया या भारतातील पहिल्या साखर कंपनीने 1842 रोजी साखरेचे उत्पादन सुरू केले होते. 1843 मध्ये कंपनीने आपली पहिली डिस्टिलरी स्थापन केली होती. या कंपनीची स्थापना होऊन 235 वर्ष झाली आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळापासून ही कंपनी अजूनही साखर उद्योगात आपले मजबूत स्थान टिकवून आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		