 
						Stocks In Focus| 28 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत होता. जागतिक संकेत आणि देशांतर्गत अनुकूल संकेतांमुळे शेअर बाजारात सकारात्मक वाढ दिसून आली होती. यूएस फेडरल रिझर्व्हद्वारे व्याज दर वाढ होत असताना आर्थिक मंदी येण्याची अपेक्षा, ट्रेझरी उत्पन्नात झालेली घसरण आणि दुसऱ्या तिमाहीतील चांगले निकाल यामुळे शेअर बाजाराला वाढण्याचे बळ मिळाले. मागील आठवड्यात शेअर बाजारात फक्त 3 दिवस व्यवहार झाले होते.
दिवाळी सुट्ट्यांमुळे दोन दिवस शेअर बाजार बंद होता. तरीही 3 दिवसात BSE सेन्सेक्स 650 अंकांनी वाढला होता, आणि 60,000 वर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 200 अंकांची वाढ दिसून आली होती, आणि निफ्टी 17,787 वर जाऊन बंद झाला होता. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती, आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. या कालावधीत 5 कंपनीच्या शेअर्सनी फक्त 3 दिवसात आपल्या शेअर धारकांना 69 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती
हेमांग रिसोर्सेस :
हेमांग रिसोर्सेस ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 97.09 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात 3 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर 69.08 टक्के वधारला आहे. हा स्टॉक 3 दिवसापूर्वी 43.50 रुपयांवर ट्रेड करत होता, आता त्यात वाढ होऊन स्टॉक 73.55 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्क्यांच्या वाढीसह 73.55 रुपयांवर ट्रेड करत होता. ज्यां गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 69.08 टक्के परताव्यासह 1.69 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. पण नेहमी लक्षात ठेवा की, स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम जास्त असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
आशीर्वाद स्टील्स :
आशीर्वाद स्टील्स कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 20.20 रुपयांवरून 28.10 रुपयांवर गेली आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समधे गुंतवणूक करून 39.11 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 35.13 कोटी रुपये आहे. मागील 3 दिवसात या स्टॉकने 39.11 टक्के परतावा कमावून दिला आहे, जो FD सारख्या इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 28.10 रुपयांवर ट्रेड करत होता.
जॉइंद्रे कॅपिटल:
जॉइंद्रे कॅपिटल कंपनीचे शेअर्स परतावा देण्याच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 36.41 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक 29.80 रुपयांवर ट्रेड करत होता, आता त्यात वाढ होऊन स्टॉक 40.65 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या समभागातून गुंतवणूकदारांनी 36.41 टक्केचा बंपर परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 56.25 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 12.29 टक्क्यांच्या वाढीसह 40.65 रुपयांवर ट्रेड करत होता.
CargoTrans मेरीटाईम :
CargoTrans मेरीटाईम कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा शेअर 87.55 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता हा स्टॉक 117 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरमधून गुंतवणूकदारांनी 33.64 टक्केचा मजबूत परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 47.53 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 1.75 टक्क्यांच्या वाढीसह 117 रुपयांवर ट्रेड करत होते.
यार्न सिंडिकेट :
मागील आठवड्यात यार्न सिंडिकेट कंपनीनेही आपल्या गुंतवणूकदारांना 33.33 टक्के परतावा कमवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 9 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 12 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी 33.33 टक्के परतावा कमवला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 4.50 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 9.29 टक्क्यांच्या बंपर वाढीसह 12 रुपयांवर ट्रेड करत होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		