12 December 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Torrent Power Share Price | टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत, नेमकं कारण काय? गुंतवणुकीपूर्वी स्टॉक वाढीचे कारण वाचा

Highlights:

  • Torrent Power Share Price |
  • टोरेंट पॉवर वर्क ऑर्डर डिटेल
  • शेअरची कामगिरी
Torrent Power Share Price

Torrent Power Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक 7 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. आणि कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते.

स्टॉक मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे टोरेंट पॉवर कंपनीने महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार केले आहेत. हेच टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअर किमतीमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. काल सकाळी टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर 7.19 टक्क्यांच्या वाढीसह 655.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 724.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टोरेंट पॉवर वर्क ऑर्डर डिटेल

सेबीला दिलेल्या माहितीत टोरेंट पॉवर कंपनी कळवले आहे की, कंपनीने महाराष्ट्र सरकार सोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार टोरेंट पॉवर कंपनी महाराष्ट्रात एक जलविद्युत प्रकल्प निर्मिती करणार आहे. त्याचे एकूण मूल्य 27,000 कोटी रुपये असेल. हा प्रकल्प पुढील 5 वर्षांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. यामुळे 13,500 लोकांना रोजगार मिळेल, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून मिळाली आहे.

शेअरची कामगिरी

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स 634.35 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सने इंट्रा डे ट्रेडमध्ये 666 रुपये उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे 20 टक्के वाढवले आहे. या वर्षी हा स्टॉक आतापर्यंत 31 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक परकी किंमत 430.90 रुपये होती.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Torrent Power Share Price today on 08 June 2023.

हॅशटॅग्स

Torrent Power Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x