
Stocks in Focus | इस्राईल आणि हमास युद्धामुळे जगात महायुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता याचे परिणाम मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर देखील पाहायला मिळत आहे. जपान सारखी अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावरून घसरून चौथ्या क्रमांकावर गेली आहे. तज्ञांच्या मते जागतिक मंदीचे संकट अधिक दाट हीट चालले आहे. भारतीय शेअर बाजारात या आर्थिक मंदीचे परिणाम पाहायला मिळत आहेत. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी सखोल संशोधन करून गुंतवणूक करण्यासाठी 5 स्टॉक शोधले आहेत. यामध्ये ज्युबिलंट फूडवर्क्स, टेक महिंद्रा, वेलस्पन इंडिया, चालेट हॉटेल्स, तन्ला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स सामील आहेत. पुढील काळात हे शेअर्स 48 टक्के परतावा देऊ शकतात.
तान्ला प्लॅटफॉर्म्स :
ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युराइटिसने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1440 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 981.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या गुंतवणूक केल्यास हा स्टॉक गुंतवणूकदारांना 48 टक्के परतावा सहज देऊ शकतो.
वेलस्पन इंडिया :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 172 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.38 टक्के वाढीसह 146.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या गुंतवणूक केल्यास हा स्टॉक गुंतवणूकदारांना 31 टक्के परतावा सहज देऊ शकतो.
ज्युबिलंट फूडवर्क्स :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 610 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 504 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या गुंतवणूक केल्यास हा स्टॉक गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा सहज देऊ शकतो.
टेक महिंद्रा :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1225 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 1,121 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या गुंतवणूक केल्यास हा स्टॉक गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा सहज देऊ शकतो.
चॅलेट हॉटेल्स :
ब्रोकरेज फर्म अँटिक स्टॉक ब्रोकिंगने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 600 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 560.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या गुंतवणूक केल्यास हा स्टॉक गुंतवणूकदारांना 8 टक्के परतावा सहज देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.