
Stocks in Focus | सध्या भारतातील रिअल्टी क्षेत्रामधे मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहे. म्हणून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने रिअल इस्टेट डेव्हलपर ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 32-35 टक्के वाढू शकतात. ( कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनी अंश )
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 550 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी कोलते पाटील डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 554.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, कोलते पाटील डेव्हलपर्स कंपनी मुंबई महानगर प्रदेशात आपला व्यवसाय मजबूत करत आहे. याशिवाय दक्षिण भारतातील बेंगळुरूमध्येही कंपनीने मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. मागील 3 दशकांमध्ये, या कंपनीने 26 दशलक्ष स्क्वेअर फूटचे प्रकल्प विकसित केले आहेत. पुढील काळात या कंपनीच्या कामगिरीत आणखी सुधारणा होणे अपेक्षित आहे. कोलते पाटील डेव्हलपर्स कंपनीला पुढील काळात विक्रीमध्ये 25 टक्के वाढ अपेक्षित आहे.
मोतीलाल ओसवाल फर्मने कोलते पाटील डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स सुमारे 7 टक्के वाढीसह 550 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 700 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणजेच अल्पावधीत गुंतवणूकदारांना 30-35 टक्के नफा सहज मिळू शकतो. 9 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 585 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढले होते. तर मागील दोन आठवड्यात हा स्टॉक 18 टक्के वाढला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 105 टक्के वाढली आहे. मागील दोन वर्षात कोलते पाटील डेव्हलपर्स स्टॉक 90 टक्के मजबूत झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.