
Stock Investment | सध्या लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करून लाखो रुपये कमावण्याचे वेध लागले आहेत. डिमॅट अकाउंट च्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जर तुम्ही ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी नवीन डिमॅट खाते उघडले असेल तर आम्ही तुम्हाला आज गुंतवणूक करण्याचे काही सोपे मार्ग सांगणार आहोत. लोकं सुरुवातीला जोशमध्ये डिमॅट अकाउंट तर उघडतात पण जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा लोक घाबरतात. प्रत्येकाच्या मनात शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवावे की गुंतवू नये, असा खूप गोंधळ असतो. पण आता अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडल्यानंतर स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी की म्युच्युअल फंडमध्ये, याची माहिती देणार आहोत.
लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक :
राइट रीसर्चने जाहीर केलेल्या अहवालानुसार मते, नवीन गुंतवणूकदारांनी मार्केटमधे लार्ज कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, आणि स्टॉक शक्य तेवढा जास्त काळ स्टॉक होल्ड करावा. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही Nifty ETF किंवा Bank Nifty इंडेक्स मध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता.
कोणते स्टॉक खरेदी करावे? :
जर तुम्ही आताच्या परिस्थितीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्या बाजारात काय वातावरण आहे, किंवा व्यवहार कसे होत आहेत, या सर्व माहितीकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकदार सुरुवातीला ITC, टाटा मोटर्स, रिलायन्स आणि एसबीआय सारख्या लार्ज कॅप स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता. ITC आणि SBI कंपनीच्या शेअरची किंमत सध्या कमी आहे, त्यामुळे तुम्ही हे स्टॉक 5-5 हजार मध्ये खरेदी करून चांगला नफा कमवू शकता.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यावर काही दिवसात भरगच्च परताव्याची अपेक्षा करू नका. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, नवीन गुंतवणूकदारांनी सुरुवातीला स्टॉकचे वर्तन शिकावे आणि चढ उतरांचे निरीक्षण करावे. अल्पावधीतच जादुई परतावा कमावण्याची अपेक्षा करू नये. परंतु चांगल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास लाभ मिळण्यासाठी दीर्घ कालावधीची प्रतीक्षा करावी.
ITC कंपनीच्या शेअरमध्ये बंपर वाढ पाहायला मिळत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी अप्रतिम परतावा कमावला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ITC चा स्टॉक 335.90 रुपये किंमत पातळीवर बंद झाला होता. त्याच वेळी, मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये, ITC च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही ITC कंपनीचा 6 महिन्यांपूर्वीचा चार्ट पॅटर्न पाहिला तुम्हाला समजेल की या कालावधीत हा स्टॉक 30.88 टक्के वाढला असून त्याची किंमत 79.25 रुपयेवर गेली आहे.
याशिवाय, जर आपण SBI चे चार्ट पॅटर्न पाहिले तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SBI कंपनीचा स्टॉक 4.65 टक्के म्हणजेच 537.35 रुपयांच्या पातळीवर क्लोज झाला होता. त्याचवेळी, मागील एका महिन्यात SBI चा शेअर 4.35 टक्क्यांनी वधारला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.