
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स ओव्हरव्हॅल्युड झाले आहे. अशा परिस्थितीत ICICI सिक्युरिटीज फर्मने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करता यावी यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. हे शेअर्स पुढील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
Advanced Enzyme :
ICICI सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के वाढीसह 404.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 570 रुपये निश्चित केली आहे. तर दुसरी टार्गेट प्राइस 650 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीपेक्षा हा स्टॉक 60 टक्के अधिक वाढू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 290 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 425 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 504 रुपये होती.
ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज :
ICICI सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.63 टक्के वाढीसह 250.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर टार्गेट प्राइस 360 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीपेक्षा हा स्टॉक 45 टक्के अधिक वाढू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 186 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 267 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 401 रुपये होती.
सोलर इंडस्ट्रीज :
ICICI सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 6,851 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी या स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 8200 रुपये निश्चित केली आहे. तर दुसरी टार्गेट प्राइस 9000 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच सध्याच्या किंमत पातळीपेक्षा हा स्टॉक 30 टक्के अधिक वाढू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 6180 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7833 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.