
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही दीर्घ काळ गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधत असाल तर हा लेख तुमच्या खूप कामाचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेल्या शेअरची यादी देणार आहोत. हे 4 दर्जेदार शेअर्स पुढील 1 वर्षाच्या काळात किमान 43 टक्के वाढू शकतात. म्हणून तज्ञांनी या शेअरमध्ये एक वर्ष कालावधी साठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
भांडवली बाजाराचा मागोवा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात भारतीय बँकांमध्ये 36 अब्ज डॉलर्सच्या ठेवी जमा होऊ शकतात. कारण डेट म्युच्युअल फंडामध्ये कर आकारणीमध्ये वृध्दी झाली आहे. ही कर आकारणी आता आयकर स्लॅबनुसार होणार आहे. यासोबतच गुंतवणुकदारांना मिळणारा इंडेक्सेशनचा फायदाही काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. याचा अर्थ डेट म्युच्युअल फंडातून LTCG लाभ काढून घेतल्याने बँकांमधील ठेवीचे प्रमाण वाढतील. याशिवाय कर्जाच्या वाढत्या मागणीमुळे पत वाढ 15.7 टक्केवर पोहचली आहे. बँक ठेव वाढ 10 टक्क्यांपेक्षा थोडी जास्त वाढू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतीय बँकांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध असून जगातील इतर कोणत्याही बँकेपेक्षा भारतीय बँकाचे नियमन चांगले आहे.
तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी निवडलले बँकिंग स्टॉक आणि त्यांची लक्ष किंमत :
ICICI बँक :
* शेअरची लक्ष किंमत : 1094 रुपये
* एका वर्षात अपेक्षित परतावा : 28 टक्के
* समजा तुमच्या कडे गुंतवणूक करण्यायोग्य 1 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. मग त्यापैकी किमान गुंतवणुक 30 टक्के गुंतवणूक या स्टॉकमध्ये करा.
इंडसइंड बँक :
* शेअरची लक्ष्य किंमत : 1408 रुपये
* अपेक्षित वार्षिक परतावा : 36 टक्के
* समजा तुमच्या कडे गुंतवणूक करण्यायोग्य 1 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. मग त्यापैकी किमान गुंतवणुक 30 टक्के गुंतवणूक या स्टॉकमध्ये करा.
फेडरल बँक :
* शेअरची लक्ष्य किंमत : 180 रुपये
* अपेक्षित वार्षिक परतावा : 43 टक्के
* समजा तुमच्या कडे गुंतवणूक करण्यायोग्य 1 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. मग त्यापैकी किमान गुंतवणुक 20 टक्के गुंतवणूक या स्टॉकमध्ये करा.
करूर वैश्य बँक :
* शेअरची लक्ष्य किंमत : 135 रुपये
* अपेक्षित वार्षिक परतावा : 38 टक्के
* समजा तुमच्या कडे गुंतवणूक करण्यायोग्य 1 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. मग त्यापैकी किमान गुंतवणुक 20 टक्के गुंतवणूक या स्टॉकमध्ये करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.