19 February 2025 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

Multibagger Penny Stocks | आयुष्यं बदलणारा शेअर, या 9 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे तब्बल 4 कोटी रुपये केले

Multibagger Penny Stocks

Multibagger Penny Stocks | डेव्हिस लॅब ही फार्मा क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी असून त्याचे बाजार भांडवल 98,972 कोटी रुपये आहे. Divis Laboratory Limited कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 19 वर्षात 41000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या शेअरमध्ये जर तुम्ही 19 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमची गुंतवणूक रक्कम 4.13 कोटी रुपये झाली असती.

ठळक मुद्दे :
* गेल्या वर्षभरात स्टॉक मध्ये तब्बल 24.04 टक्क्यांची घसरण झाली.
* 2022 मध्ये स्टॉक 20 टक्क्यांनी घसरला आहे.
* 18 ऑक्टोबर 2021 रोजी हा स्टॉक आपल्या किमतीच्या 5,425.10 रुपये या सर्वोच्च पातळीवर गेला होता.

52 आठवड्यांचा उच्चांक :
डेव्हिस लॅब कंपनीचा शेअर सध्या त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या जवळपास 32 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. 19 वर्षांपूर्वी एका शेअरची किंमत 9 रुपये होती. आज त्याच शेअरची किंमत 3,721 रुपये झाली आहे. मागील 19 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. डेव्हिस लॅब कंपनी हे या दिग्गज शेअरचे नाव आहे. कंपनी ने इतका मजबूत परतावा दिला आहे की 19 वर्षांपूर्वी जर तुमची या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची गुंतवणूक 4.13 कोटी रुपये पेक्षा जास्त झाली असती.

डेव्हिस लॅब ही भारतातील फार्मा क्षेत्रातील एक मोठी दिग्गज कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल सध्या 98,972 कोटी आहे. कंपनी आपली उत्पादने 95 देशांमध्ये निर्यात करते. या कंपनीचे नाव सक्रिय फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स बनवणाऱ्या जगातील 3 सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये देखील समाविष्ट आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, ही कंपनी सध्या पूर्णपणे कर्जमुक्त आहे.

डेव्हिस लॅब च्या शेअरची कामगिरी :
मागील शुक्रवारी दिवसा अखेर शेअर ची किंमत 3,721.10 रुपयांवर बंद झाली होती. या दिवशी शेअर मध्ये तब्बल 5.75 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली होती. याच्या एक दिवस आधी, तो शेअर दिवसा अखेर 3,948.05 रुपये जाऊन बंद झाला होता. 13 मार्च 2003 रोजी स्टॉकची किंमत फक्त 9 रुपये होती. आपण जर आजच्या किमतीशी शेअर ची तुलना केल्यास, ह्या स्टॉक ने तब्बल 41,245.56 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. 18 ऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत शेअरमध्ये तब्बल 485.82 टक्के वाढ झाली आहे. तेव्हा त्याची किंमत 635.20 रुपये होती.

मागील वर्षभरात शेअर मध्ये 24.04 टक्क्यांनी घट पाहायला मिळाली. 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉक मध्ये तब्बल 20 टक्क्यांची घसरण झाली होती. 18 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर या स्टॉकने आपला 52 आठवड्याचा 5,425.10 रुपयाचा उच्चांक गाठला होता. 26 मे 2022 रोजी स्टॉकने आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी गाठली होती आणि शेअर ची किंमत 3,365.55 रुपये वर गेली होती. त्यानुसार, सध्या शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या किमतीच्या उच्चांक पातळीच्या सुमारे 32 टक्के खाली ट्रेड करत आहे. आणि 52 आठवड्यांच्या नीचांक पातळीच्या 11 टक्के वर ट्रेड करत आहे.

गुंतवणूक करावी की करू नये ?
शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदारांनी आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की कंपनीच्या महसूलात जबरदस्त वाढ झाली आहे. कमी कर, कर वाजा केल्या नंतरचा नफा, दुहेरी अंकात गेला आहे. कंपनीचा महसूल अंदाजापेक्षा कमी असला तरी, येत्या तिमाहीत शेअर मध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळू शकते. शेअर बाजार तज्ञ आणि विश्लेषकांनी या शेअर्स च्या बाबतीत “बाय” (खरेदी) रेटिंग दिले आहे. तज्ञांना वाटते की दीर्घकालात हा स्टॉक जबरदस्त वाढू शकतो आणि पुढील काळात 4,450 रुपयांची लक्ष्य किंमत गाठू शकेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Penny Stocks Devi’s laboratory share price return on 16 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x