14 December 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका

Stocks To Buy

Stocks To Buy | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या बँकेने आपले मार्च 2024 तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स या बँकेने 1281 कोटी रुपये सर्वकालीन उच्च निव्वळ नफा कमावला आहे. या बँकेचा मालमत्तेवरील परतावा 3.5 टक्के आणि इक्विटीवरील परतावा 26.1 टक्के नोंदवला आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या एनपीएमध्ये जबरदस्त सुधारणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 52.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

MK Global फर्मच्या तज्ञांच्या मते, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स पुढील काळात 65 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ही किंमत शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा 22-23 टक्के अधिक आहे. 11 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 63 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची कर्ज वाढ वार्षिक आधारावर 25 टक्के नोंदवली गेली आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे मार्जिन बऱ्यापैकी सुधारले आहेत. बँकेचा मालमत्तेवरील परतावा मार्च 2024 तिमाहीत 3.3 टक्के आणि संपूर्ण आर्थिक वर्षात 3.5 टक्के नोंदवला गेला आहे. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचा विश्वास आहे की, पुढील काळात या बँकेची क्रेडिट वाढ 20-25 टक्के पर्यंत जाऊ शकते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे NIMs म्हणजेच निव्वळ व्याज मार्जिन आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 9 टक्केवर जाण्याची अपेक्षा आहे.

मार्च 2024 तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 27 टक्के वाढीसह 934 कोटी रुपये नोंदवले गेले होते. बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 9.4 टक्के नोंदवले गेले होते. तर प्री-प्रोव्हिजनिंग ऑपरेटिंग नफा 26 टक्के वाढीसह 519 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च 2024 तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा निव्वळ नफा 7 टक्के वाढीसह 330 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर बँकेची एकूण ठेव वाढ 23 टक्के वाढली आहे. या बँकेच्या कर्ज पुस्तकाचा आकार वार्षिक आधारावर 24 टक्के वाढीसह 29780 कोटी रुपये झाला आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा सकल NPA 2.1 टक्के होता. तर निव्वळ NPA 0.3 टक्के नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy Ujjivan Small Finance Bank Share Price NSE Live 24 May 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x