
Stocks To Buy | भारतातील मोठ्या म्युच्युअल फंड कंपनीने या जबरदस्त परतावा देणाऱ्या कंपनीतील 6 टक्क्यांहून अधिक शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनीचे शेअर्स मागील दोन दिवसांत 10 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.
किर्लोकसर न्यूमॅटिक शेअर:
किर्लोकसर न्यूमॅटिक कंपनीचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर इंट्रा-डे ट्रेडिंग मध्ये 7 टक्क्यांनी वाढले होते. आणि त्याची किंमत 520 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. भारतातील काही मोठ्या म्युच्युअल फंडांनी या कंपनीतील 6 टक्क्यांहून अधिक शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसांत 10 टक्क्यांहून उसळी पाहायला मिळत आहे.
स्टॉक एक्सचेंजने जाहीर केलेल्या डेटानुसार, भारतातील मोठ्या म्युच्युअल फंडांनी L&T म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड, फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंड आणि ICICI प्रुडेन्शियल, लाइफ इन्शुरन्स या मोठ्या दिग्गज कंपनीनीं एकत्रितपणे किर्लोस्कर न्यूमॅटिक मध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये कंपनीच्या च्या एकूण इक्विटी भागापैकी 6.15 टक्के म्हणजेच 39,70,000 इक्विटी शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याच वेळी, कंपनीचे प्रवर्तकानी आपल्या वाट्यातील काही शेअर्स विकून प्रॉफिट बूक केला आहे.
कंपनी व्यवसाय सविस्तर ?
KPCL कंपनी प्रामुख्याने तेल आणि वायू, अभियांत्रिकी, पोलाद, सिमेंट, अन्न आणि पेय क्षेत्रांना अभियांत्रिक उत्पादने आणि सोल्युशन्स ऑफर करून सेवा देणार्या कॉम्प्रेशन आणि ट्रान्समिशन क्षेत्रात सक्रिय व्यवसाय करत आहे. कंपनीनं आपला उद्योग कॉम्प्रेशन सेगमेंट एअर, गॅस आणि रेफ्रिजरेशन कंप्रेसर, पॅकेजेस आणि सिस्टम्सच्या मोठ्या श्रेणीचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा आणि उभारणी/कमिशनिंगमध्ये आपला व्यापार विस्तारलेले आहे. कंपनीचा विस्तारलेला व्यापार ट्रान्समिशन विभाग जसे की पवनचक्की, औद्योगिक आणि सागरी अनुप्रयोगांसाठी सानुकूलित रेल्वे ट्रॅक्शन गीअर्स आणि गिअरबॉक्सेसचे डिझाइन, उत्पादन व्यवसाय आणि पुरवठा व्यवसायामध्ये गुंतलेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.