
Stocks To Buy | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 PSU बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल दिसून आली होती. कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन्ही स्टॉकमध्ये 4 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली होती. या दोन्ही PSU बँकांनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सप्टेंबर तिमाहीचे जबरदस्त निकाल केले, ज्याने बाजारातएक नवीन ऊर्जा भरून दिली होती. या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज फर्मने स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या बँकांच्या व्यवसायात सकारात्मक वाढ दिसून आली आहे. आणि भविष्यातही या स्टॉकमध्ये तेजी कायम राहील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत हे 2 PSU बँकेचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये जोडण्याची जबरदस्त संधी आली आहे.
कॅनरा बँक :
ब्रोकरेज फर्म MK Global ने कॅनरा बँकेचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक साठी तज्ञांनी 330 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या 259 रुपयांच्या ट्रेडिंग किंमतीनुसार हा स्टॉक पुढील काळात 27 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचाPAT 2530 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता, जो तज्ज्ञांच्या अपेक्षे भरपूर चांगला आहे. बँकेचा सुधारित मार्जिन आणि कमी कर यामुळे कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पत वाढ वार्षिक आणि तिमाही आधारावर अनुक्रमे 21 टक्के आणि 6 टक्के नोंदवण्यात आली आहे. रिटेलसोबतच कॉर्पोरेट सेगमेंटमध्ये ही शानदार रिकव्हरी दिसून येत आहे. कंपनीच्या NIM मध्ये 2.86 टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे, आणि बँकेची मालमत्तेची गुणवत्ता देखील सुधारली आहे. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष FYFY23-25 मध्ये कमाई वार्षिक 22-27 टक्के ने वाढू शकते. आर्थिक वर्ष FY25 पर्यत RoA/RoE 0.9 टक्के आणि 17 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी कॅनरा बँकेचा स्टॉक पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 340 रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. पुढील काळात हा स्टॉक 31 टक्के परतावा देऊन शकतो अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म म्हणते की कंपनीच्या ऑपरेटिंग कामगिरी मध्ये सुधारणा दिसून येत आहे. कर्ज वाढ मजबूत असून मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे. आर्थिक वर्ष FY23/24 PAT अनुक्रमे 17 टक्के /19 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष FY24 मध्ये RoA/RoE अनुक्रमे 1.0.टक्के /16.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याच्या सल्ला दिला असून त्यासाठी 65 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या 47 रुपयांच्या ट्रेडिंग किंमतीनुसार हा स्टॉक 38 टक्के परतावा देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की सप्टेंबर तिमाही बँकेसाठी फायदेशीर राहिली होती. बँकेच्या NII आणि इतर उत्पन्नात भरघोस वाढ झाल्यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ दिसून आली आहे. स्लिपेज नियंत्रित केले गेले आहेत. प्रत्येक विभागात कर्ज देय वाढ दिसून आली आहे. कॉर्पोरेट, कृषी, रिटेल आणि MSME क्षेत्रात सकारात्मक वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष FY23 मध्ये PAT 14 टक्क्यांनी उसळी घेईल अशी अपेक्षा आहे. RoA/RoE अनुक्रमे 0.8 टक्के /13.9 टक्के वर जाण्याचा अंदाज आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.