14 May 2025 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS JP Power Share Price | पॉवर कंपनी पेनी स्टॉकमध्ये तेजी, तुमची खरेदी केला? यापूर्वी 1442% परतावा दिला - NSE: JPPOWER IRB Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये 2.84% तेजी; पुढे रॉकेट तेजीचे संकेत; संधी सोडू नका - NSE: IRB Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी; शेअर प्राईसमध्ये मोठी तेजी दिसणार, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, बाय कॉल सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

Stocks to BUY | हा शेअर 1 महिन्यातच 39 टक्के वाढला, आता बोनस शेअर्स जाहीर, पण तुम्हाला पुढेही कमाईची मोठी संधी

Stocks to Buy

Stocks to BUY | मागील एका महिन्यात शुभम पॉलिस्पिनच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. फक्त एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 39 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना 1:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे.

शुभम पॉलिस्पिनचा शेअर :
वस्त्रोद्योगाशी निगडीत असलेली कंपनी शुभम पॉलिस्पिनचा शेअर मंगळवारी 5 टक्के वाढीसह अप्पर सर्किटवर जाऊन बंद झाला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. शुभम पॉलिस्पिनच्या शेअर्समध्ये फक्त एका महिन्यात तब्बल 39 टक्के वाढ दिसून आली आहे. या कंपनीने आपल्या भागधारकांना 1:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीची आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना भरघोस बोनस शेअर्सची जाहीर करण्याची दुसरी वेळ आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये, या कंपनीने आपल्या भागधारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.

फक्त एका महिन्यात या शेअर्स ची किंमत 220 रुपये पासून ते 300 रुपये पर्यंत गेली आहे. सध्या 300 रुपये प्रती शेअर किंमत ओलांडलेल्या शुभम पॉलिस्पिन कंपनीचे शेअर्स 18 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 220.20 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते. 16 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीच्या शेअर्समधे 5 टक्के अप्पर सर्किट लागला आणि शेअर ची किंमत 305 रुपयांवर जाऊन बंद झाली. शुभम पॉलिस्पिनच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसात जवळपास 9 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स तब्बल 85 टक्के वधारले आहेत. शुभम पॉलिस्पिन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 112.80 रुपये आहे.

4 वर्षांत 1300 टक्के पेक्षा जास्त परतावा :
शुभम पॉलिस्पिनच्या शेअर्सनी मागील 4 वर्षांत 130 टक्के पेक्षा जास्त उसळी घेतली आहे. 7 जानेवारी 2019 रोजी शुभम पॉलिस्पिन कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 20.50 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 16 ऑगस्ट 2022 रोजी शुभम पॉलिस्पिन कंपनीचे शेअर्स BSE वर 305 रुपयांच्या किमतीवर जाऊन बंद झाले. जर तुम्ही जानेवारी 2019 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 14.80 लाख रुपये परतावा मिळाला असता.

ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्मने शुभम पॉलिस्पिन कंपनीचे सुमारे 1 लाखाहून अधिक शेअर्स खरेदी करून त्यात भरघोस गुंतवणूक केली आहे. मॉरिशसस्थित ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेडने नुकताच मल्टीफिलामेंट यार्न मॅन्युफॅक्चरिंग कंपनी शुभम पॉलिस्पिनचे 102000 शेअर्स खरेदी करून त्यात गुंतवणूक केली आहे. AG Dynamic Funds ने बीएसईमध्ये लिस्टेड या कंपनीचे शेअर खुल्या बाजारातून विकत घेतले होते आणि त्याची सरासरी प्रति शेअर किंमत 215.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks to Buy shubham polyspin limited share price return on 17 August 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या