 
						Subros Share Price | सुब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 486.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुब्रोस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका सकारात्मक बातमीमुळे पाहायला मिळत आहे.
भारत सरकारकडून सुब्रोस लिमिटेड कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत सरकारमधील दिग्गज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रकच्या केबिनमध्ये एसी बनवण्याचे अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. या संबंधीच्या अधिसूचनेच्या मसुद्याला भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
सुब्रोस लिमिटेड ही कंपनी ऑटोमोटिव्ह एअर कंडिशनिंग संबंधित क्षेत्रात व्यवसाय करते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी N2 आणि N3 श्रेणीतील ट्रक्सच्या केबिनमध्ये एअर कंडिशनिंग सिस्टम बसवणे अनिवार्य करण्याचा विचार मांडला होता. या संबंधित मसुद्याच्या अधिसूचनेला भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
भारत सरकार जानेवारी 2025 पासून हे एसीचे नियम लागू करणार आहे. सुब्रोस लिमिटेड या कंपनीमध्ये सुरी कुटुंबाने 36.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. जपानच्या डेन्सो कॉर्पोरेशनने या कंपनीमध्ये 20 टक्के भाग भांडवल आणि जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशन कंपनीने 11.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.88 टक्के वाढीसह 461.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील सहा महिन्यांत सुब्रोस लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 49.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 31.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 जानेवारी 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 307.60 रुपयेवर ट्रेड करत होते. सुब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7 जुलै 2023 रोजी 486.55 रुपयेवर ट्रेड करत होते. हा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 520.90 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 271.05 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		